अनंत-राधिकाचा साखरपुडा, अंबानीच्या 'खास' कपड्यांची एवढी चर्चा का?

मुंबई तक

अनंत अंबानीचा राधिका मर्चंटसोबत गुरुवारी संध्याकाळी साखरपुडा पार पडला, अँटेलियामध्येच हा संपूर्ण सोहळा रंगला

फोटो सौजन्य: Instagram

साखरपुड्यानंतर मुकेश अंबानी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी एकत्र फोटोशूट केलं

फोटो सौजन्य: Instagram

फोटोमध्ये अनंत-राधिका, मुकेश अंबानी, नीता अंबानी, मुलगी ईशा आणि जावई आनंद पिरामल, मोठा मुलगा आकाश आणि सून श्लोका सोबत दिसत होते.

फोटो सौजन्य: Instagram

अंबानी कुटुंबातील सर्व सुनांनी खूपच ग्लॅमरस असा पोशाख कॅरी केलेला, ज्यामुळे त्यांचा लूक हा रॉयल वाटत होता.

फोटो सौजन्य: Instagram

नीता अंबानींनी डिझायनर हेवी गोल्डन साडी परिधान केलेली. तसंच त्यांचा मेकअप देखील अगदी रॉयल पद्धतीचा होता.

फोटो सौजन्य: Instagram

सून श्लोका मेहताने फ्लोरल एम्ब्रॉयडरी असलेला सिल्व्हर लेहेंगा परिधान केला होता. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती.

फोटो सौजन्य: Instagram

मुलगी ईशा अंबानीने सिल्व्हर-व्हाइट आउटफिट परिधान केला होता. यासोबत तिने रुबी ज्वेलरी परिधान केलेली, ज्यामुळे तिला लुक खूप सोबर दिसत होता.

फोटो सौजन्य: Instagram

राधिकाने सोनेरी रंगाचा हेवी डिझायनर लेहेंगा-चोली परिधान केली होती. तिने सोबत मॅचिंग चुनरी देखील घेतलेली. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

फोटो सौजन्य: Instagram

अंबानी कुटुंबीयांचे हे सगळे कपडे अबू जानीने खास डिझाइन केले होते.

फोटो सौजन्य: Instagram