Aanant Ambani: राधिकाला पाहताच अनंत अंबानींनी दिली अशी रिअॅक्शन...

मुंबई तक

मुंबईतील अँटेलियात मुकेश अंबानींचे धाकटे चिरंजीव अनंत यांचा राधिकासोबत साखरपुडा पार पडला.

बालपणीची मैत्रिण असणारी राधिका आता त्यांची अर्धांगिनी होणार आहे.

अंबानी कुटुंबाने त्यांच्या नव्या सुनेचे साखरपुड्यादिवशी धुमधडाक्यात स्वागत केले.

सोशल मीडियावर अंबानी कुटुंबाची नवी सून आणि साखरपुड्याचे व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहेत.

साखरपुड्यादिवशी, दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत राधिकाची ग्रँड एन्ट्री झाली.

व्हायरल व्हिडीओत राधिकाला पाहता क्षणी अनंत अंबानी हे प्रचंड आनंदी झाले.

यानंतर, राधिकाला जवळ जाऊन त्यांनी मिठी मारली. त्यावेळी कुटुंबातील सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

राधिकाने या खास दिवसासाठी गोल्डन रंगाचा लेहेंगा परिधान केलेला, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

राधिका तिच्या सुंदर, निरागस आणि गोड हास्यामुळे सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे.