मुंबई तक
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचं गुरुवारी राधिका मर्चंटसोबत साखरपुडा पार पडला.
एंगेजमेंट सोहळा मुंबईतील त्यांच्या घरी अँटिलिया येथे पार पडला, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
साखरपुडा सोहळ्याच्या जे फोटो समोर आले आहेत त्यात अनंतचे वजन खूप वाढलेले दिसत आहे.
अनंतने काही महिन्यांपूर्वी तब्बल 108 किलो वजन कमी केले होते. पण पुन्हा त्याचे वाढलेले वजन पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
अनंत अंबानीचा आताचा फोटो पाहिल्यास तो पूर्वीसारखाच लठ्ठ झाल्याचं दिसत आहे.
आता सर्वांना हे जाणून घ्यायचे आहे की अनंतचे वजन पुन्हा कसे वाढले?
काही वर्षांपूर्वी अनंतने प्रशिक्षक विनोद चन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली डाएट आणि वर्कआउटद्वारे वजन कमी केले होते.
पण जसं वजन कमी केलं जातं तसंच ते कायम राखणं देखील खूप आवश्यक आहे. अन्यथा वजन पुन्हा वाढू शकते.
हेल्थलाइनच्या मते, वजन कमी झाल्यानंतर जर कोणी पुन्हा जुनी लाइफस्टाइल फॉलो केलं तर वजन पुन्हा वाढू लागते.
चयापचय मंद झाल्यानंतर जर पूर्वीप्रमाणेच पदार्थांचं सेवन केलं तर त्या व्यक्तीचं वजन वाढू शकतं.
2003 च्या संशोधनानुसार, पौगंडावस्थेतील आहारामुळे भविष्यात लठ्ठपणा आणि खाण्याच्या विकारांचा धोका वाढतो.
जर एखाद्याने जास्त ताण घेतला तर कोर्टिसोल हार्मोन वाढतो ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो.