मुंबई तक
अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना आणि इवर यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
शाही पद्धतीने झालेल्या या लग्नात रॉयल पाहुणे दिसले. याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आता आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अलानाचा भाऊ अहान शाहरुख खानच्या 'आय एम द बेस्ट' या गाण्यावर नाचताना दिसतोय.
यावेळी लग्नाला शाहरुख खान, पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यननेही हजेरी लावली. तसंच त्यांची मॅनेजर पूजा ददलानीही उपस्थित होती.
अलानाच्या लग्नात पांडे कुटुंब खूप एन्जॉय करताना दिसलं. अनन्या यावेळी सुंदर आणि स्टायलिश साडी नेसलेली दिसली.
अनन्या तिचा चुलत भाऊ अहान आणि वडिल चंकी पांडेसोबत 'सात समंदर पार' या गाण्यावर डान्स करताना दिसली.
या लग्नात वधू-वरांनंतर फक्त अनन्याचीच चर्चा होती. शाहरुख खान आणि गौरी यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमात आणखी भर पडली.