मुंबई तक
उद्योगपती अनिल अंबानींचं घर भारतातील टॉप 10 आलिशान आणि महागड्या घरांपैकी एक आहे.
मुंबईतील वांद्रे परिसरात पाली हील परिसरात अनिल अंबानींचं हे 17 मजली घर आहे.
अनिल अंबानींच्या या 17 मजली घराचं नाव 'एबोड' असं आहे.
'एबोड' या शब्दाचा अर्थ म्हणजे 'ते ठिकाण जिथे आपण राहतो' असा होतो.
अंबानींचा एबोड टॉवरमध्ये हेलिपॅड, स्विमिंग पूल, जीम यांसारख्या सोयी-सुविधा आहेत.
अनिल अंबानींचं कार कलेक्शन हेही थक्क करणारं आहे. त्यासाठी मोठा लाउंज विभागही आहे.
अनिल अंबानींच्या बाल्कनीतून निसर्गरम्य वातावरण, सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य बघायला मिळते.
अनिल अंबानी हे पत्नी टीना, दोन मुलं जय अनमोल आणि जय अंशुल यांच्यासोबत टॉवरमध्ये राहतात.
अनिल अंबानीच्या एबोड या आलिशान टॉवरची किंमत तब्बल 5 हजार कोटी रूपये इतकी आहे.