Mumbai Metro 3 अंतिम टप्प्यात : अंडरग्राऊंड स्टेशन्सच्या कामाचे फोटो आले समोर...

मुंबई तक

मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे.

कुलाबा-वांद्रे ते सीप्झ अशी ही मार्गिका असणार आहे.

या टप्प्यातील सिद्धिविनायक स्टेशन्सचे फोटो समोर आले आहेत.

लिफ्ट आणि एस्केलेटरसह ग्रॅनाइट आणि क्लॅडिंग काम प्रगतीपथावर आहे.

काळबादेवी मेट्रो स्थानकाचाही फोटो समोर आला आहे.

अतिशय दाटीवाटीच्या ठिकाणी हे स्थानक बांधलं जात असून यामध्ये NATM (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड) तसेच कट आणि कव्हर कार्यपद्धती या दोन्हींचा वापर करण्यात आला आहे.