मुंबई तक
देशी दारू उच्चारताच रंगीबेरंगी, दुर्गंधीयुक्त आणि कडू दारूची प्रतिमा मनात उमटते.
परदेशातून आयात केलेली दारू म्हटलं तर त्याचा ढोबळ अर्थ इंडियन मेड फॉरेन लिकर (IMFL) असा होतो.
भारतात विदेशीच्या नावाने विकली जाणारी बहुतांश दारू आणि देशी यात फारसा फरक नसतो. हे जाणून खरं तर तुम्हाला धक्का बसू शकतो.
विदेशी आणि देशी यांच्यात फारसा फरक का नाही? चला हा मुद्दा तपशीलवार समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
देशी दारूला तांत्रिक भाषेत रेक्टिफाइड स्पिरीट म्हणतात. देशी दारू मोलॅसिस किंवा इतर कृषी उत्पादनांपासून तयार केली जाते.
तर, विदेशी किंवा किंवा इंडियन मेड फॉरेन लिकर (IMFL) तयार करण्यासाठी याच रेक्टिफाइड स्पिरिटचा वापर केला जातो.
भारतातील बहुतेक IMFL तयार करण्यासाठी देशी दारूचा वापर केला जातो. IMFL देशीपेक्षा अधिक अत्याधुनिक आहे.
विदेशी किंवा IMFL विविध प्रक्रियांद्वारे देशी किंवा रेक्टिफाइड स्पिरिट पास करून आणि काही फ्लेवर्स जोडून तयार केले जातात.
यामुळे भारतातील बहुतेक व्हिस्की ही प्रत्यक्षात रम आहे!