मुंबई तक
आशिया कप 2022 साठी भारतीय संघ सध्या दुबईत मुक्कामी आहे. दुबई हे संयुक्त अरब अमिरातीमधील सुंदर शहरांपैकी एक आहे. या सुंदर शहरात खेळाडू क्रिकेटसोबतच मजाही करताना दिसत आहेत.
सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देवीशा शेट्टी दुबई मरीनाला भेट देण्यासाठी बाहेर गेले होते. दुबई मरीना हे समुद्राच्या काठावर वसलेले एक अतिशय सुंदर स्थळ आहे. दुबई मरीनाच्या आसपास अनेक खरेदीची ठिकाणे असल्याने, येथे सुट्टी घालवण्यासाठी सर्वांचीच पहिली पसंती असते.
सूर्यकुमार यादव गेल्या काही मॅचेसमध्ये जबरदस्त खेळत आहे. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्याने फक्त 18 धावा केल्या होत्या, पण हाँगकाँगविरुद्ध त्याची बॅटिंग जबरदस्त होती.
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार आणि रवी बिश्नोई देखील पाम जुमेरा बीचवर स्पीडबोटमध्ये चील करताना दिसून आले. अर्शदीप सिंगने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दोन विकेट घेवून विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
एका फोटोमध्ये रवि बिश्नोई बोट चालवतानाही दिसत आहेत.
दुसरीकडे, वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने समुद्रकिनाऱ्यावर टाइमपास करताना दिसत आहे. कुलदीप सेनही नेट गोलंदाज म्हणून संघाशी जोडला गेला आहे.
आयपीएल 2022 मध्ये कुलदीप सेनने राजस्थान रॉयल्ससाठी चमकदार कामगिरी केली होती.
फिरकी गोलंदाज हरप्रीत ब्रार हा नेट बॉलर म्हणून टीमशी जोडला गेला आहे. 26 वर्षीय हरप्रीत ब्रार इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करतो.