Surekha Yadav : आशियातील पहिल्या महिला लोको पायलट बनल्या वंदे भारतच्या सारथी

विद्या

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोलापूर ते सीएसएमटी 'वंदे भारत' ट्रेन चालविली.

13.3.2023 रोजी 'वंदे भारत' ट्रेन चालवून सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

सुरेखा यादव म्हणाल्या, नवीन काळातील, अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे.

ट्रेन चालवायला शिकण्याच्या प्रक्रियेत सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, क्रू मेंबर्ससोबत समन्वय, सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश होतो.

यावेळी सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ८ वर सत्कार करण्यात आला.

साताऱ्यातील सुरेखा यादव, 1988 मध्ये भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनल्या आहेत.