Athiya-KL Rahul wedding : राहुल-आथियाच्या लग्नाचं, ठिकाणही ठरलं!

मुंबई तक

बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन सुरू लवकरच सुरू होईल. त्यामुळेच सेलिब्रिटींच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

अभिनेता सुनिल शेट्टी मुलीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्थ आहे. लग्नाची अगदी जय्यत तयारी सुरू आहे.

आता अथिया आणि केएल राहुल इतर सेलिब्रिंटीप्रमाणे कुठे लग्न करणार असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

अथिया आणि केएल राहुलचं लग्न 23 जानेवारीला सुनिल शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यावर होणार आहे.

सुनिल शेट्टीच्या या बंगल्यात लग्नाच्या तयारीसाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

मेहंदीपासून ते लग्नापर्यंतचे सर्व कार्यक्रम 3 दिवस या बंगल्यातच होणार आहेत.

खंडाळ्यातील बंगल्यात अथिया आणि केएल राहुलच्या लग्नासाठी दिग्गज सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत.