भविष्यात असतील 'अशा' आधुनिक आणि आलिशान Concept Car!

मुंबई तक

ऑटो एक्सपो 2023 मध्ये अनेक कंपन्यांनी भविष्यातील कार आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केलं आहे.

कॉन्सेप्ट कार्सच्या सादरीकरणातून ऑटो क्षेत्रातील नेमकं भविष्य काय असेल हे मांडण्याचा यावेळी प्रयत्न करण्यात आला आहे.

ऑटो एक्सपोच्या या प्रदर्शनात अनेक दिग्गज कंपन्यांच्या फ्यूचर कॉन्सेप्ट कार्सचे सादरीकरण करण्यात आले.

मारूतीच्या फ्यूचर Maruti eVX Electric SUV कारमध्ये 60 हजार वॅटचा बॅटरी पॅक वापरण्यात आला.

मारूतीची ही कॉन्सेप्ट कार एका सिंगल चार्जमध्ये 550 किमीपर्यंतची रेंज देणार आहे.

टाटाची Tata Avinya Concept इलेक्ट्रिक कार प्रवाशांना हॉरिझोन विंग डोरप्रमाणे चांगल्या सुविधा देणार आहे.

टाटाने Tata Sierra Concept ईव्ही हे नवीन कार व्हर्जन लाँच केली आहे. यात ग्लॉस रूफ, एसयूव्ही आणि आकर्षक सुविधा आहेत.

कियाची Kia EV9 Concept इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 450 किमीपर्यंतच्या रेंजसह अनेक फिचर देते.

ऑटो एक्सपो 2023 मध्ये अशा अनेक फ्यूचर इलेक्ट्रिक कार्सचे प्रदर्शन करण्यात आले आहे.