Bachchu Kadu Health : डोक्याला गंभीर इजा, बच्चू कडूंना नागपूरला हलवलं

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू बुधवारी दुचाकी अपघातात जखमी झाले.

बच्चू कडू सकाळी मॉर्निंग वॉक करत होते. रस्ता ओलांडताना हा अपघात झाला.

सकाळी 6 ते 6.30 वाजेच्या दरम्यान भरधाव दुचाकीने बच्चू कडूंना जोराची धडक दिली.

दुभाजकावर जाऊन पडले. त्यामुळे त्यांच्या पायाला आणि डोक्याला मार लागला.

डोक्याला चार टाके पडले असून, त्यांना उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलंय.

बच्चू कडू यांच्यावर नागपुरातील न्यूरॉन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.