बाळासाहेब ठाकरेंसोबत सावलीसारखे असणारे थापा आता शिंदेंसोबत...

मुंबई तक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासार्ह सेवक अशी ओळख असलेले चंपासिंह थापा यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.

चंपासिंह थापा हे जवळपास 40 वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्यासह सावलीसारखे सोबत होते.

गोरेगावात लहान-मोठी कामे करून पोट भरणारे थापा भांडूपचे नगरसेवक खिमबहाद्दूर थापा यांचा हात धरून ‘मातोश्री’त आले आणि स्वत:ला बाळासाहेबांना अर्पण करून टाकले.

थंड पण भेदक डोळ्यांचा हा तरुण इमानदार आणि जिवाला जीव देणारा आहे, हे बाळासाहेबांच्या जाणकार नजरेने नेमके हेरले होते.

बाळासाहेबांचा दिनक्रम सांभाळणे आणि त्यांची सेवा करणे, त्यांच्या जेवणाची, औषधाच्या वेळांची काळजी घेणे हे थापांनी स्वत:चे व्रत मानले.

बाळासाहेबांची जिवापाड काळजी घेणारे थापा हा थोड्याच काळात मातोश्री परिवाराचे सदस्य झाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाशेजारी उभे राहून थापा स्तब्धपणे पाहत आणि त्यांना गुलाबपुष्पांच्या गुच्छाने वारा घालतानाचे दृश्य महाराष्ट्राने बघितले होते.