'या' महाराष्ट्रीय माणसाने 38 वर्षांपूर्वीच काढली होती 'भारत जोडो यात्रा'

मुंबई तक

सध्या भारतात काँग्रेस नेते राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' चर्चेत आहे.

'भारत जोडो यात्रा काढणारे राहुल गांधी पहिले नाहीत. 38 वर्षांपूर्वी अशीच यात्रा काढली गेली होती.

थोर समाजसेवक मुरलीधर देविदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांनी सुरू केली.

या यात्रेची सुरूवात भारताच्या दक्षिणेकडून झाली होती आणि उत्तर-पूर्वेकडून पश्चिमेकडे शेवट झाला होता.

त्यावेळी भारत जोडो यात्रेचा उद्देश आणि यात्रेचा नेताही विशेष होता.

भारत जोडो यात्रेचा उद्देश असा होता की, 1984 मध्ये जेव्हा सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाईनंतर तणावाचं वातावरण होतं.

देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला धोका निर्माण झाला होता, सर्वत्र संघर्ष आणि अशांततेचं वातावरण होतं.

त्याच वर्षी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर अनेक ठिकाणी शिखांवर हिंसाचार झाला.

अशांतता वाढल्यानंतर गांधीवादी बाबा आमटे यांनी समतेचा संदेश देण्यासाठी हा प्रवास सुरू केला.

ही भारत जोडो यात्रा पायी आणि सायकलने १४ राज्यांमध्ये करण्यात आली होती.

Rohini Sampat Thombare