मुंबई तक
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो यात्रा' पंजाबमध्ये पोहोचली आहे.
मंगळवारी सकाळी राहुल गांधी हरियाणातील अंबाला शहरातून अमृतसरला पोहोचले.
राहुल गांधी यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात दर्शन घेतले.
यावेळी राहुल गांधी पगडी घातलेले दिसले.
हरियाणामध्ये काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चा आज शेवटचा दिवस होता.
कालका चौक आणि पुढे शंभू सीमेवरून ही यात्रा पंजाबमध्ये दाखल झाली.
राहुल गांधींची पंजाबमधील 'भारत जोडो यात्रा' 11 जानेवारीपासून सुरू होणार असून 19 जानेवारीपर्यंत ते पंजाबमध्ये असतील.