रघुराम राजन काँग्रेससाठी दुसरे मनमोहन सिंग ठरणार?

मुंबई तक

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन सध्या चर्चेत आहेत.

राजन यांनी बुधवारी राजस्थानमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत भाग घेतला.

रघुराम राजन राहुल गांधींसोबत चालताना दिसून आले.

या दरम्यान, राहुल गांधी यांनी राजन यांची एक छोटीशी मुलाखतही घेतली.

एक अर्थतज्ञ म्हणून राजन यांचं भाकीत नेहमी लोकांना नव्या पद्धतीनं विचार करायला लावतं. ते नरेंद्र मोदी सरकारच्या अर्थव्यवस्थेबाबतच्या धोरणांवर ते सुरुवातीपासूनच टीका करत आहेत.

आता त्यांची राहुल गांधींसोबतची जवळीक होत असल्यामुळे ते काँग्रेसचे नवे मनमोहन सिंग होणार का? काँग्रेस पुन्हा एकदा देशाला अर्थतज्ञ पंतप्रधान देणार का? असा सवाल विचारला जात आहे.