कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ...यांची RT-PCR गरजेची

मुंबई तक

जगातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे पुन्हा जोर धरू लागली आहेत. चीनमध्ये परिस्थिती सर्वात वाईट आहे.

नवीन वर्षात परिस्थिती आणखी बिकट होईल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले की, १ जानेवारीपासून सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

प्रवास करण्यापूर्वी नेगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागेल.

सरकारने ज्या देशांसाठी RT PCR अनिवार्य केले आहे त्यात चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड यांचा समावेश आहे.

तसे, 24 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय फ्लाइटमधून येणाऱ्या प्रवाशांपैकी 2 टक्के प्रवाशांची रँडम कोरोना चाचणी केली जात आहे. याशिवाय विमानतळावर कोविड प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे.