Bigg Boss 16 : बिग बॉसच्या घरात दिसणार कायनात अरोरा?

मुंबई तक

१ ऑक्टोबरपासून बिग बॉस १६ शो सुरू होतोय. यावेळी बिग बॉसच्या घरात कायनात अरोरा दिसणार असल्याची चर्चा रंगलीये.

कलर्सच्या इन्स्टाग्रामवर एका अभिनेत्रीची मुलाखत शेअर करण्यात आलीये. अभिनेत्रीने मास्क लावलेला असून, त्यामुळे ही स्पर्धक कोण यावर तर्कविर्तक लावले जाताहेत.

बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये ही अभिनेत्री कायनात अरोर असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, कायनात अरोराबद्दल महत्त्वाची माहिती समोर आलीये.

स्वतः कायनात अरोराने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून महत्त्वाचा खुलासा केला आहे.

आपण बिग बॉस १६ मध्ये सहभागी होणार नाही. त्यामुळे अशा बातम्या पसरवू नयेत, असं कायनात अरोराने म्हटलं आहे.

कायनात अरोराला तुम्ही ग्रँड मस्ती सिनेमात मार्लोच्या भूमिकेत बघितलं असेल.

कायनात अरोरा मॉडेल आणि अभिनेत्री असून, तिचं वय सध्या ३५ वर्ष आहे.

कायनात अरोराने हिंदी, पंजाबी, तेलगू, मल्याळम चित्रपटातही काम केलेलं आहे.