'शरद पवार हे तर...', चित्रा वाघ देवेंद्र फडणवीसांबद्दल काय म्हणाल्या?

मुंबई तक

भाजपच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोलापूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांच कौतुक केलं.

त्या म्हणाल्या, "एकेकाळी मी शरद पवारांच्या सानिध्यात काम केलं आणि आता फडणवीसांसोबत काम करत आहे."

"देवेंद्र फडणवीस हे एक व्हिजन असणारा नेता आहे."

"महाराष्ट्राला एका यशाच्या शिखरावर पोहोचवणारा नेता असेल, तर एकमेव देवेंद्र फडणवीस आहेत."

"शरद पवार हे तर 50- 55 वर्षापासून राजकारणात आहेत. त्यावेळचं राजकारण वेगळं होतं. आताची आव्हानं वेगळी आहेत."

"आता भारत कुठेतरी महासत्ता होण्याच्या दिशेवरती आहे त्याला नरेंद्र मोदी लीड करतात."

"देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम नेता महाराष्ट्र सारख्या प्रोग्रेसिव्ह राज्यातून आपले योगदान देत आहेत."