लाखमोलाचे ठरलेले दोन आमदार BJP ने पंधराच दिवसात गमावले!

मुंबई तक

पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे मंगळवार (3 डिसेंबर) प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

Twitter

जगतापांच्या निधनाने महाराष्ट्र भाजपला पंधराच दिवसात दुसरं मोठं नुकसान झालं आहे.

Twitter

कारण साधारण पंधरा दिवसांपूर्वीच म्हणजे 22 डिसेंबर 2022 रोजी भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं होतं.

Twitter

मुक्ता टिळक-लक्ष्मण जगतापांनी राज्यसभा आणि विधानपरिषदेत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत देखील पक्षासाठी मतदान केलेलं.

Twitter

भाजपसाठी ही दोन्ही मतं फार महत्त्वाची ठरली होती. कारण विजयानंतर BJPने अचानक गिअर चेंज करुन थेट सत्ताबदल घडवलेला.

Twitter

आपल्या पक्षासाठी समर्पण भावनेने शेवटपर्यंत कर्तव्य बजावणारे आमदार गमावल्याने भाजपची पुण्यात मोठी हानी झाली आहे.

Twitter

दोन्ही आमदारांच्या निधनामुळे दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणुका जाहीर केल्या जातील. ज्यामध्ये भाजप कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Twitter