खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणांना भाजपकडून 'ऑफर'

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भाजपकडून ऑफर देण्यात आलीये.

नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत, तर रवी राणा हे बडनेराचे आमदार आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना पक्षात प्रवेश करण्याचं आवाहन केलं.

नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना बावनकुळेंनी राणा दाम्पत्याला हे आवाहन केलं.

बावनकुळे म्हणाले, 'आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे विचार हिंदुत्ववादी आहे.'

'नवनीत राणा व रवी राणा यांनी भाजप पक्षामध्ये यावं त्यांनी वेगळी निवडणूक लढवू नये.'

'त्यांनी (नवनीत राणा व रवी राणा) भाजप पक्ष स्वीकारावा,' असं बावनकुळेंनी म्हटलंय.