Ganesh Chaturthi 2022 : शमिता शेट्टी दिसली पिवळ्या शरारात... शिल्पासोबतही खास फोटोसेशन

मुंबई तक

Shamita Shetty Pics: अभिनेत्री शमिता शेट्टीने आपल्या कुटुंबासोबत गणपती बाप्पाचे स्वागत केले. तिने कुटुंबासोबत पूजेचे फोटो शेअर केले आहेत.

बिग बॉसनंतर शमिता शेट्टी पुन्हा चर्चेत आली आहे. शमिताला तिच्या फॅशन सेन्समुळे लाखो लोकं फॉलो करतात. गणेशोत्सवातही शमिताची वेगळी स्टाईल पाहायला मिळाली.

फोटोमध्ये शमिताने पिवळा शरारा परिधान केलेला दिसत आहे. तिचा हा साधा लूक चाहत्यांची मनं जिंकत आहे.

गणेश चतुर्थीचे फोटो शेअर करत शमिताने लिहिले, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा... देव तुमची सर्व संकटे दूर करो आणि तुमच्या आयुष्यात शांती आणि भरपूर आनंद आणू दे.

शमिताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत सर्वांनीच तिच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शमिताने बहीण शिल्पा शेट्टीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोन्ही बहिणी मिठी मारताना दिसत आहेत.