Shanaya Kapoor झाली मिंगल! कॉलेजमधील 'या' हॅंडसमला करते डेट?

मुंबई तक

बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री त्यांच्या कामाप्रमाणे लव्हअफेअर्ससाठीही चर्चेत असतात.

बॉलिवूडमध्ये आजपर्यंत कोणाचेही अफेअर हे सोशल मीडिया आणि ट्रोलर्सपासून लपलेलं नाही.

असचं काहीसं शनाया कपूरसोबत घडतंय.

आता ही शनाया कपूर कोण? असा प्रश्न पडला असेल. शनाया अनिल कपूर यांच्या भावाची म्हणजे संजय कपूरची मुलगी आहे.

दिसायला अगदी देखणी आणि स्टायलिश असणारी शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच चाहत्यांची आवडती बनली.

रिलेशनशिप स्टेटसबाबत सध्या ती चर्चेत आहे. ती रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या येतायत.

शनाया आता सिंगल राहिलेली नाही ती तिच्या कॉलेज मित्राला डेट करतेय असं कळतंय.

या हॅंडसम बॉयचं नाव करण कोठारी असल्याची माहिती समोर आलीये.

शनाया आणि करण कॉलेजपासून एकमेकांना ओळखतात. ते परदेशात एकाच विद्यापीठातून शिकले.

सध्या याबाबत शनायाने जाहीररित्या काहीही पोस्ट केलेले नाही.

यामुळे शनाया आणि करणच्या रिलेशनबद्दल सध्या तरी काही स्पष्टपणे बोलता येत नाही.