चर्चा तर होणारचं! औरंगाबादमध्ये रेड्याच्या वाढदिवसाला केक, बॅनर अन् मेजवानी

मुंबई तक

औरंगाबदमध्ये सुरज नावाच्या रेड्याच्या वाढदिवसाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

चेलीपुरा भगात राहणारे शंकरलाल पहाडिया यांचा सुरज नावाचा रेडा दोन वर्षाचा झाला.

पहाडिये यांनी वाढदिवसानिमित्त शहरभर बॅनर लावले होते. सोबत आज रेड्याची मिरवणूक काढली.

डोलीबाजा लावत वाजत-गाजत शहरातून मिरवणूक काढली.

शहराच आराध्य दैवत असलेल्या संस्थान गणपती येथे मिरवणुकीची सांगता करुन केकही कापला.

शिवाय वाढदिवसांसाठी येणाऱ्या पाहुण्यांना जेवणात चविष्ट मेजवानीही ठेवण्यात आली होती.