पेप्सी-कोका कोलाला टक्कर द्यायला रिलायन्स सरसावलं; Campa Cola तीन फ्लेवरमध्ये लाँच!

मुंबई तक

70 च्या दशकातील फेमस कोला ब्रँड Campa Cola आता पुन्हा भारतीय बाजारात लाँच झाला आहे.

या स्वदेशी ब्रँडला उद्योजक मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाने खरेदी केलं आहे.

रिलायन्स समूहाने Campa Cola ला खरेदी करून यामधील तीन फ्लेवर लाँच केले आहेत.

कॅम्पा कोलाने पुन्हा बाजारात आपलं स्थान निश्चित करण्यासाठी पावलं उचलली आहेत.

पेप्सी-कोका कोला सारख्या ब्रँड्सना हा कोला ब्रँड बाजारात टक्कर देईल असं म्हटलं जातंय.

रिलायन्सने दिल्ली स्थित प्युअर ड्रिंक समूहासह या कोला ब्रँडसाठी करार केला आहे.

कॅम्पा कोला हा स्पार्कलिंग वेबरेज कॅटेगरीतील भारताचा स्वतःचा ब्रँड आहे.

ऑरेंज, लेमन आणि कोला असे तीन कॅम्पा कोलाचे फ्लेवर आहेत.