Mumbai-Pune Expressway : ट्रकच्या धडकेत कारचा भीषण अपघात, 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील आढे गावाच्या हद्दीत हा अपघात घडला.

भरधाव कार, मालवाहू ट्रकवर जाऊन आदळली आणि ही भयानक घटना घडली.

हा अपघात इतका भयंकर होता की, कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

अर्धी कार ट्रक मागच्या बाजूने खाली गेली आणि तीन जणांवर काळाने घाला घातला.

अपघात इतका विचित्र होता की, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. यातील एकाप्रवाशाचं शीर धडापासून वेगळं झालं.

बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील मृतदेह बाहेर काढले.

सध्या अपघातात मरण पावलेल्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.