मुंबई तक
फुले, आंबेडकर आणि कर्मवीर भाऊरावांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटलांवर काही दिवसांपूर्वीच शाईफेक करण्यात आलेली.
चंद्रकांत पाटलांवर करण्यात आलेल्या या शाईफेकीनंतर राजकारण बरंच तापलं होतं.
या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांना पुन्हा तशीच घटना होण्याची भीती वाटत असल्याने त्यांनी जाहीर कार्यक्रमात जाताना चेहऱ्यावर चक्क फेस शील्ड घातला.
चंद्रकांत पाटील यांनी फेस शील्ड नेमकं का घातला? याबाबत त्यांना पत्रकारांनी प्रश्नही विचारले पण त्यांनी त्यावर काहीही उत्तर दिलं नाही.
शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील हे बरेच संतापले होते, या प्रकरणात एका पत्रकाराला देखील ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, नंतर त्याला सोडून देण्यात आलं.