By elections : लक्षात ठेवा! चिंचवड-कसबा पेठ पोटनिवडणुकीची तारीख बदलली

मुंबई तक

चिंचवड, कसबा पेठ मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

31 जानेवारी रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार आहे.

मात्र, निवडणूक कार्यक्रमात छोटा असला, तरी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या मतदानाचा दिवस बदलला आहे.

चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी 27 ऐवजी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी असून, 2 मार्च रोजी मतमोजणी आहे.