मुंबई तक
राज्यातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पहिल्यांदाच मुंबईत आले.
मुंबईतील विविध विकासकामांचं उद्घाटन आणि काही प्रकल्पांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते पार पडले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा पार पडली. मात्र सर्वात जास्त चर्चा रंगली ती त्यांच्या प्रचंड जल्लोषात झालेल्या स्वागताची.
पंतप्रधान मोदी हे व्यासपीठावर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणीपासून बनवलेला परिधान मोदींना घातला.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठी प्रतिकृती भेट देण्यात आली.
यानंतर एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींच्या गळ्यात सोनचाफ्याने बनविलेला एक खास हार घातला.