मुंबई तक
महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नावर विधीमंडळाने केलेल्या ठरावावरील चर्चेदरम्यान विधिमंडळात एकनाथ शिंदे विरुद्ध अनिल परब खडाजंगी पहायला मिळाली.
एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना उद्धव ठाकरे यांना शाब्दिक टोले लगावले.
शिंदेंच्या टोलेबाजीनंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी अभिनंदनपर भाषण करताना शिंदे यांच्या टोमण्यांवर सव्याज उत्तर दिलं.
बाळासाहेबांच्या पायावर हात ठेवा आणि सांगा की पुढच्या वेळी भाजपाच्या तिकिटावर आम्ही लढणार नाही, हे सांगण्याचं आव्हान दिलं.
यातील किती लोक भाजपाच्या तिकिटावर लढणार आहेत, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, असा टोला परब यांनी लगावला.
परब यांच्या टिकांवर शिंदेंनीही महाविकास आघाडी केली त्याचदिवशी बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचाही अधिकार तुम्हाला राहिला नाही. तो अधिकार आम्हाला आहे, असं सांगितलं.