मुंबई तक
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात थंडीची लाट पसरली आहे.
महाबळेश्वर नजीकच्या तापोळा, जावळी, बामनोलीत बर्फवृष्टीचा थरार आहे.
महाबळेश्वरमधील या ठिकाणी तापमान पाच अंशावर पोहोचलं आहे.
तापोळा बामनोली परिसरात पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना मिनी काश्मिरचा अनुभव मिळतोय.
पन्नास वर्षांच्या तापमानाचा रेकॉर्ड मोडत तापोळा बामनोली परिसराने थंडीचा उंच्चाक गाठला आहे.
निसर्गाचा अद्भुत आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना इथला गारठा आणि गुलाबी थंडीचा अनुभव चांगलाच आलाय.
भारतात होणारी बर्फवृष्टी महाबळेश्वर पाचगणीसह मिनी काश्मीर तापोळा बामनोलीला ही अनुभवण्यास मिळाला.