Rahul Gandhi यांचा पहिला पगार किती होता? जॉबला कुठे होते?

मुंबई तक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या पहिल्या पगाराबाबत भाष्य केलं आहे.

कर्ली टेल्स'च्या कामिया जानी यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी याबाबत सांगितलं आहे.

राहुल गांधी २५ वर्षांचे असताना लंडनमधील 'मॉनिटर' नावाच्या कंपनीत सल्लागार म्हणून काम करत होते. 

त्यावेळी त्यांचा पहिला पगार अडीच ते तीन हजार पाऊंड्सच्या घरात होता. 

तो पगार घरभाडे आणि इतर गरजेच्या गोष्टींमध्येच जात असे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

भारतीय रुपयांत आजच्या घडीला ही रक्कम अडीच ते तीन लाखांच्या घरात जाते.