Mla Divya Maderna: स्वतःच्याच सरकारवर भडकल्या काँग्रेसच्या आमदार, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

दिव्या मदरेणा या राजस्थानमधील ओसियान विधानसभेतील काँग्रेसच्या आमदार आहेत.

राजस्थान विधानसभेत काँग्रेसच्या आमदार दिव्या मदेरणा यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेस आमदार दिव्या म्हणाल्या, 'शहीद विरांगणांच्या मुद्द्यावर बोलल्यानं त्यांच्या भागातील विकासकामे ठप्प झाली.'

'2 दिवसात 44 रस्त्यांची कामेही रद्द करण्यात आली आहेत.'

स्वतःच्याच सरकारविरोधात मोर्चा करत काँग्रेसच्या आमदार दिव्या म्हणाल्या की, 'रस्ते बांधले नाहीत, तर शहिदांच्या पत्नीप्रमाणे तोंडात घास घेऊन आंदोलन करू.'

दिव्या मदेरणा यांनी असंही सांगितलं की, '25 सप्टेंबरच्या रात्री मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सांगण्यावरून राजीनामा न दिल्याने त्यांना लक्ष्य केलं जात आहे.'

मदेरणा पुढे म्हणाल्या, 'नगरविकास मंत्री शांती धारीवाल हे कोणालाही भेटत नाहीत आणि राजासारखे जगतात. मीना आणि जाट समाजाकडे दुर्लक्ष केलं जात आहे.'

'गुजर, मीना आणि जाट समुदाय 80 टक्के आहेत, ज्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आहे. अशा स्थितीत सहा महिन्यांनी निवडणूक आहे, मग निवडणुकीत काय होणार?'

काँग्रेस आमदार दिव्या मदेरणा यांनी सरकारविरोधात उघड बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्या अनेक मुद्द्यांवर बोलल्या आहेत.