वडिलांच्या पावलावर सत्यजीत तांबेंचं पाऊल! 2009 च्या पोटनिवडणुकीत काय झालं होतं?

मुंबई तक

नाशिक पदवीधर निवडणुकीत नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. 

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेत आपल्या मुलासाठी मार्ग प्रशस्त करुन दिला. 

सत्यजीत तांबे यांची बंडखोरी आज राज्यभरात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.

मात्र खुद्द सुधीर तांबेंनीही बंडखोरी करतच नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात विजय मिळविला होता.

२००९ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून अॅड. नितीन ठाकरे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती.

यावेळी नितीन ठाकरे आणि भाजपचे उमेदवार प्रसाद हिरे यांचा तांबेंनी पराभव केला होता.

यानंतर सुधीर तांबे पुन्हा काँग्रेस पक्षात आले आणि सलग दोनदा ते या मतदारसंघातून निवडून आले.