पोलिसांना चकवा, भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या घरासमोरच जाळला पुतळा

मुंबई तक

नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विधान केलं.

अजित पवार म्हणाले, 'छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते, त्यांचा धर्मवीर उल्लेख करणं चुकीचं आहे.'

अजित पवारांच्या विधानावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.

बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर त्यांचा पुतळा जाळला.

'अजित पवार हाय हाय', 'धरणवीर अजित पवार..', अशा घोषणा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

भिगवन चौकात आंदोलन केलं जाणार होतं, मात्र पोलिसांना गुंगारा देत कार्यकर्ते अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर जमले.

जोरदार घोषणाबाजी करत पवार यांच्या पुतळ्याचं दहन केले. बारामती शहर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.