ICC Ranking : इशान किशन आणि दीपक हुडाची आयसीसी रँकिंगमध्ये जोरदार मुसंडी

मुंबई तक

ICC ने गुरुवारी ताजी रँकिंग जाहीर केली. या अंतर्गत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या, यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आणि अष्टपैलू दीपक हुडा यांनी आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत स्थान पटकावले आहे.

All Photo Sources Google

इशानने एकदिवसीय क्रिकेटमध्ये नुकतंच द्विशतक केले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत 10 स्थानांची मोठी झेप घेतली आहे. तो आता 23व्या क्रमाकांवार पोहोचला आहे

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात दीपक हुडा विजयाचा हिरो ठरला होता. सामनावीर म्हणून त्याची निवड करण्यात आली. दीपक हुडाने या सामन्यात 23 चेंडूत 41 धावांची धडाकेबाज खेळी केली.

यामुळे त्याला बंपर फायदा झाला आणि त्याने 40 स्थानांनी झेप घेत टॉप-100 मध्ये प्रवेश केला आहे. आता दीपक हुड्डा 97 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हार्दिक पांड्या देखील भारताचा अष्टपैलू खेळाडू आहे

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत कर्णधार बनलेला हार्दिक पांड्या 50 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. म्हणजेच त्याने टॉप-50 मध्ये प्रवेश केला.

T20 रँकिंगमध्ये भारताचा सूर्यकुमार यादव 883 रेटिंगसह क्रमांक एकवर आहे.