मुंबई तक
क्रिकेट आणि क्रिकेटपटूंची नेहमीच चर्चा होत असते.
जसं क्रिकेटचं स्वरूप बदलत चाललं आहे, तसंच क्रिकेटपटूही.
हल्ली प्रचंड क्रिकेट खेळवलं जातं, त्यामुळे खेळाडूही फिटनेससाठीही मेहनत घेतात.
पूर्वी काही असे खेळाडू होते, जे अंगकाठीने बारीक होते; पण त्यांनी स्वत:मध्ये बदल घडवलेत.
फिट खेळांडूंमध्ये ज्यांची नावं घेतली जातात त्यात, एक एस. श्रीसंत! श्रीसंत जलदगती गोलंदाज होता.
आयपीएल स्पॉट फिक्सिंगमुळे त्याच्यावर ७ वर्षांची बंदी घातली गेली होती.
मैदानापासून दूर राहिल्यानंतर, श्रीसंतने जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं.
स्फोटक फलंदाज क्रिस गेलही पूर्वी अंगाने जेमतेमच होता.
गेलने योग्य डाएट आणि जीम करत शरीर कमावलं.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीही त्याच्या फिटनेस आणि लूकसाठी नेहमीच चर्चेत असतो.
संघात विराट ज्यावेळी नवीन होता तेव्हा तो सिंपल आणि बारीक होता. आता तो पूर्णपणे बदलून गेलाय.
श्रीलंकेचा स्पिनर महिश तिक्ष्णानेही स्वत:मध्ये बदल घडवला. त्याचं वजन पूर्वी 117 किलो होतं.
महिशने बरंच वजन घटवलंय, आता तो फिटनेस फ्रीक झालाय.
इंग्लंडच्या क्रिस ट्रेमलेटच्या बॉडीची चर्चा नेहमीच असते.
रिटायर्डमेंटनंतर, क्रिस ट्रेमलेट आता बॉडीबिल्डर बनला. त्याच्याकडू अनेकजण फिटनेस ट्रेनिंग घेतात.