cryptocurrency : मुंबईतल्या उद्योजकाने गमावले 12 लाख, वाचा काय घडलं?

मुंबई तक

सायबर गुन्हेगारीचा मुंबईतल्या एका उद्योजगाला याचा फटका बसलाय.

मुंबईत क्रिप्टोकरन्सी फ्रॉड प्रकरण समोर आलंय. क्रिप्टो अकाऊंटमधून 12 लाख गेले.

कांदिवलीत 37 वर्षीय उद्योजकासोबत हा प्रकार घडला आहे.

उद्योजक नेटबँकिंगच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये खरेदी-विक्री करतात.

ठाणे येथे असताना त्यांच्या क्रिप्टो खात्यातून 15,097 अमेरिकी डॉलर काढण्यात आले.

क्रिप्टो अकाऊंट हॅक करून 12 लाख रुपये काढण्यात आले.

1 नोव्हेंबर 2022 रोजी ही घटना घडली असून पोलीस याचा तपास करत आहे.