मुंबई तक
रत्नागिरी शहराजवळील शेट्येनगर येथे एका घरात आज (18 जानेवारी) पहाटे अचानक स्फोट झाला.
स्फोटाचं कारण होतं सिलेंडर. गॅस गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्फोट इतका भीषण होता की कुटुंबातील 2 महिलांनी जागेवरच प्राण सोडले. तर 2 जण जखमी आहेत.
भीषण सिलेंडरच्या स्फोटामुळे दुमजली घराचा स्लॅब कोसळला.
स्लॅब कोसळल्याने 2 महिल्या अडकल्या होत्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावण्यात आला.
बचावकार्य सुरू असताना ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 2 महिलांना बाहेर काढण्यात जवळजवळ 2 तास लागले.
यादरम्यान दोन्ही महिलांचा मृत्यू झाला, तर इतर दोन जखमींना रूग्णालयात दाखल केलं आहे.
घराचा स्लॅब कोसळला, तर आजूबाजूच्या घरांचे दरवाजे आणि काचा देखील फुटल्या आहेत.
पोलीस तपास सुरू असून यानंतर स्फोटाचं नेमकं कारण स्पष्ट होईल.