मुंबई तक
डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांचा देशातील टॉप-10 श्रीमंतांमध्ये समावेश आहे.
ग्लॅमरपासून दूर राहून अगदी साधेपणाने वावरणारे दमानी हे राहतात मात्र प्रचंड महागड्या घरात.
दमानी यांची गणना अनुभवी गुंतवणूकदारांमध्ये केली जाते आणि ते शेअर बाजारातील दिवंगत राकेश झुनझुनवाला यांचे गुरू आहेत.
जर त्यांच्या घराबद्दल बोलायचे झाले तर मुंबईतील मलबार हिल भागात असलेल्या त्यांच्या बंगल्याची किंमत सुमारे 1001 कोटी आहे.
D-Mart च्या संस्थापकाने एप्रिल 2021 मध्ये हा बंगला खरेदी केला होता आणि त्यावर्षी खरेदी केलेले ते सर्वात महागडे घर होते.
राधाकिशन दमानी यांच्या या बंगल्याचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे 61,916 चौरस मीटर आहे आणि ते 92 वर्षे जुने आहे.
मागील अहवालानुसार, सूट दिल्यानंतरही दमानी कुटुंबाने या मालमत्तेसाठी तब्बल 30 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले होते.
ग्राउंड प्लस दुमजली बंगला बाहेरून जितका सुंदर दिसतो तितकाच आतूनही आलिशान आहे.
Forbes च्या 100 भारतीय श्रीमंतांच्या यादीनुसार राधाकिशन दमानी हे देशातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलियनर्स इंडेक्सनुसार, दमानी यांची एकूण संपत्ती $16.1 अब्ज एवढी आहे.