औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचणं पडलं महागात; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई तक

महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात मुघल शासक औरंगजेबाच्या फोटोसोबत नाचणाऱ्या ८ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (जका खान, वाशिम)

मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारीच्या रात्री जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे दादा हयात कलंदर साहेबांची संदल मिरवणूक काढण्यात आली होती.

संदल मिरवणुकीत नाचणाऱ्यांच्या गर्दीत दोन मोठी छायाचित्रे होती एक टिपू सुलतानची आणि दुसरी औरंगजेबाची.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंगरुळपीर पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप एकालाहीअटक झालेली नाही.

शहरात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सध्या पोलिसांच्या तत्परतेमुळे शहरात शांतता कायम आहे.

या घटनेच्या निषेधार्थ शहरातील स्थानिक हिंदू संघटनेने औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन केले.