मुंबई तक
राज्यातील सत्तांतरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पहिल्यांदाच मुंबईत आले होते.
मुंबईतील विविध विकासकामांचं उद्घाटन आणि काही प्रकल्पांचं लोकार्पण असा त्यांचा भरगच्च कार्यक्रम होता.
मात्र या दरम्यानचा शिंदे फडणवीस यांचा एक फोटो आणि व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सर्व नेते व्यासपीठावर आल्यानंतर शिंदे मोदींच्या मागे उभे होते.
त्याचवेळी फडणवीस यांनी शिंदेंना बोट दाखवून मोदी यांच्या शेजारी उभं राहण्याबाबत सांगितलं.
त्यानंतर शिंदेही तातडीने मोदी यांच्या शेजारी जाऊन उभे राहिले. मात्र यावरुन फडणवीस चांगलेच ट्रोल होत आहेत.
यापूर्वीही पत्रकार परिषदेत शिंदे यांचा माईक खेचण्यावरुन फडणवीस ट्रोल झाले होते.
पत्रकार परिषदेत शिंदेंना प्राऊंटींग करण्यावरुनही फडणवीस यांना टिकेला सामोर जाव लागलं होतं.