मुंबई तक
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे
दीपिकाचं 5 जानेवारी 1986 रोजी डेनमर्कच्या कोपेनहेगेन येथे झाला होता.
दीपिका सध्या तिचा आगामी चित्रपट पठाणच्या गाण्यामुळं चर्चेत आहे
दीपिकाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास ती एका चित्रपटासाठी 15 ते 30 कोटी रुपये घेते.
केवळ चित्रपटांतूनच नाही तर दीपिका ब्रँड एंडोर्समेंट, चित्रपट निर्मिती आणि अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करूनही मोठी कमाई करते.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची सध्या एकूण संपत्ती सुमारे $40 दशलक्ष म्हणजेच 330 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
2018 सालच्या फोर्ब्स इंडियाच्या सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या अभिनेत्रीला स्थान देण्यात आले आणि ती दीपिका पदुकोण होती.