Sachin Tendulkar च्या लेकीचा देसी अंदाज, पाहा साराचे खूपच खास फोटो

मुंबई तक

सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर हिला पारंपारिक लूक करण्याची आवड आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

जर मुलींना लग्नासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी पारंपारिक लूक करायचा असेल तर, त्या साराचा लूक फॉलो करू शकतात.

या फोटोमध्ये साराने फिकट हिरव्या रंगाचा चिकनकरी कुर्ता कॅरी केला आहे. त्यावर मॅचिंग टिकली आणि लाइट मेकअप केला आहे.

डिझायनर अनिता डोंगरेच्या स्वर्गम घरारा सेटमध्ये सारा खूपच सुंदर दिसतेय. यावर तिने कानातले, हेवी मेकअप आणि कुरळ्या केसांनी लूक पूर्ण केला.

यामध्ये साराने गुलाबी-गोल्डन प्रिंटेड लेहेंगा चोली कॅरी केली आहे. यावर नेकलेस-कानातले आणि टिकली लावून हा लूक पूर्ण केला.

साराने या लूकमध्ये डिझायनर ब्लॅक लेहेंगा-चोली घातली आहे. कोल्ड शोल्डर आणि ऑफ नेक असलेला ब्लाउज तिने परिधान केला आहे. यावर सेमी-कॅज्युअल मेकअप केला आहे.

मॅरीगोल्ड गार्डन जॅकेट घरारा सेट हा गोपी वाडे यांनी डिझाइन केला आहे. साराच्या या ड्रेसची किंमत 38 हजार रूपये होती.

साराने या फोटोत पांढरी नक्षी असलेला लाल चिकनकरी कुर्ता घातला आहे. कानातले आणि त्यावर सिंपल बिंदी लावली आहे. यामध्ये ती सिंपल आणि सोबर दिसतेय.