मुंबई तक
नवीन वर्ष अगदी जवळ आले आहे. अशा स्थितीत अनेकजण बाहेर पार्टी करण्याचा विचार करत असतील.
या कार्यक्रमांमध्ये दारुचं सेवन करणं हे सामान्य आहे. पण मद्यपान करताना अनेकजण काही चुका करतात
यामुळेच दारुचं सेवन केल्यावर कोणत्या चुका करु नये हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
योग्य ड्रिंक ऑर्डर करा: नवीन ड्रिंक घेणं टाळा. विविध प्रकारच्या अल्कोहोलचे मिश्रण किंवा कॉकटेल पिणं देखील टाळलं पाहिजे.
ड्रिंक पिण्याची योग्य पद्धत: प्रत्येक पेय पिण्याची एक पद्धत आहे. त्याबाबत आधी जाणून घ्या.
मर्यादेत प्या: अत्यंत मर्यादित प्रमाणात दारुचं सेवन करा. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये स्वतःची काळजी स्वत:च घ्या.
चिडू किंवा रागावू नका: मद्यधुंद अवस्थेत भांडण केल्याबद्दल तुमची चूक नसली तरीही लोक तुम्हाला दोष देऊ शकतात हे लक्षात ठेवा.
जास्त नशा झाल्यास काय करावे: भरपूर पाणी प्या, ब्लॅक कॉफी प्या. त्याने नशा उतरण्यास मदत होईल.
मद्यपान केल्यानंतर झोपणे घातक: तज्ज्ञांचे असेही मत आहे की, जास्त मद्यपान केल्यानंतर झोपण्याचा प्रयत्न करणे घातक ठरू शकते.
उलट्या झाल्यास काय करावे: जाणूनबुजून उलट्या करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा पोटाच्या स्नायूंना मोठे नुकसान होऊ शकते.
सकाळी उठल्यानंतर काय करावे : डोकेदुखीसाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदना कमी करणारे औषध घेऊ शकता. पाणी भरपूर प्या.