अंड उकडलं की नाही... बघण्याची ही पद्धत माहितीये का?

मुंबई तक

रोज उकडलेलं अंडं खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. यासाठीच दिवसभरात एक-दोन अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.

हिवाळी हंगामात अंडी खाल्ल्याने शरीरास त्याचे अनेक फायदे होतात. एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात.

कधीही उकडलेली अंडी खाणं हे योग्य डाएट आणि शरीरास पोषक ठरते.

यावेळी अंड उकडलं की नाही हे समजण्यात समस्या येत असतील तर, यासाठी एक सोपी पद्धत आहे.

काही सोप्या पद्धती आहेत ज्यामुळे अंड उकडलेलं सहज समजते.

अंडी उकडण्यासाठी ती थेट थंड पाण्यात टाकू नका. पाण्याला उकळ आली की, अलगद पाण्यात सोडा.

अंडी पाण्यात पूर्णपणे बुडतील याची काळजी घ्या.

नेहमी अंडी उकडताना मध्यम आचेवर,12 ते 15 मिनिटे त्याला उकळ येऊद्या ही योग्य वेळ आहे.

अंडं बाहेर काढून ते फिरवून पाहा जर ते पडलं तर ते अजून उकडलेलं नाही.

जर, अंडं फिरवल्यावर ते न पडता फिरले तर, समजून जा की, ते उकडलं आहे.

तसेच, ज्यावेळी अंडं उकडतं त्यावेळी त्यावर पांढऱ्या फेसाचा एक तरंग पाहायला मिळतो.