Make curd at home: थंडीत दही लावताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या

मुंबई तक

अनेकजण विकतचं दही खाण्यापेक्षा घरी लावलेलं दही खाणं पसंत करतात.

दही लावण्यासाठी विशेषता गरम वातावरण आवश्यक असतं.

थंड वातावरण दही लावण्यासाठी योग्य नसतं, अशी लोकांची तक्रार असते.

यामुळे, थंडीच्या वातावरणात दही लावण्यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत.

थंडीत दही लावताना सर्वात आधी 250 ग्रॅम दूध कोमट उकळवून घ्या.

कोमट उकळवलेल्या दूधात एक चमचा दही घालून मिक्स करा.

एक चमचा दही घातलेल्या दूधात 2-3 मिरचा टाका.

नंतर, दही लावलेलं भांडं झाकून एखाद्या उबदार ठिकाणी ठेऊन द्या.

तसंच, जर उबदार कपड्याने भांडं बांधून ठेवल्यास दही उबेमुळे चांगलं लागेल.

जोपर्यंत दही लागत नाही तोपर्यंत भांडं हलवू नये हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.