मुंबई तक
अथिया शेट्टी आणि केएल राहुल आजच्या (23 जानेवारी) शुभ मुहूर्तावर लग्न बंधनात अडकणार आहेत.
सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्यावर हा विवाह सोहळा पार पडेल.
आता सर्वांच्या नजरा खिळलेल्या आहेत ते अथियाचा ब्रायडल लूक पाहण्यासाठी...
अथियाला आपण याआधी रील आयुष्यात ब्रायडल लूकमध्ये पाहिलेलं आहे.
मात्र, आज अथिया रियल आयुष्यातील ब्राइड बनणार आहे.
अथियाने कित्येकवेळा फोटोशूटसाठी लेहंगा, त्यावर साजेशे दागिने घातलेले आपण पाहिलेलं आहे.
अथिया ट्रेडिशनल लूकसाठी नेहमी ट्रेंडिंग असते. चाहत्यांना तिचा हा अंदाज फार आवडतो.
अथियाचा गोल्डन साडीमधला ग्लॅमरस लूक त्यावर, हिऱ्यांचा मांग टिका यात ती खूप सुंदर दिसतेय.
तसंच, फिश कट असलेल्या गुलाबी, पिवळ्या रंगाच्या आणि त्यावर गोल्डन नक्षीकाम असलेल्या लेहेंग्यात अथिया स्टायलिश दिसते.