Sara Ali Khan : रस्त्यावर प्यायली चहा, चुलीवर बनवलं जेवण.. साराच्या 'या' अंदाजावर चाहते फिदा

मुंबई तक

हिमाचल प्रदेशमध्ये अभिनेत्री सारा अली खान आई अमृता सिंगसोबत सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली आहे.

याठिकाणी साराने आईसोबत बिजली महादेवचंही दर्शन घेतलं.

सारा अली खानने तिच्या सोशल मीडियावर या ट्रिपचे अनेक फोटो शेअर केले आहेत, जे सध्या व्हायरल होत आहेत.

फोटो व्हायरल होण्यामागे एक खास कारण आहे, ते म्हणजे साराचं सिंपल लाइफस्टाईल.

हे फोटो पाहून चाहते म्हणाले की, 'सारा धार्मिक असण्यासोबतच तिचं राहणीमान अगदी सामान्यांप्रमाणे आहे.'

एका फोटोमध्ये सारा रस्त्याच्या कडेला बसून चहा पिताना दिसत आहे.

याशिवाय सारा आणि अमृता दुकानात बसून चुलीवर जेवण बनवताना दिसत आहेत.

दोघीही ढाब्यावर बसून देसी जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

चाहते साराच्या साधेपणावर फिदा झाले आहेत. त्यांना तिचा हा अंदाज फार आवडला आहे.