कंगना आणि जावेद अख्तर यांचा वाद कोर्टात सुरू आहे, अशात कंगनाने चकीत करणारं वक्तव्य केलं आहे.कंगनाने म्हटलं आहे की मी ऋतिक रोशनची माफी मागणार नाही म्हटल्यानंतर जावेद अख्तर यांनी माझी बदनामी केली.जावेद अख्तर यांनी अशीही धमकी दिली होती की माफी मागितली नाहीस तर परिणाम भोगावे लागतील असंही कंगनाने म्हटलंय.कंगनाने हा दावाही केला आहे जावेद अख्तर तिला आत्महत्या करण्यास भाग पाडत होते, त्यामुळे ती मानसिक त्रासातूनही गेली.मीडिया रिपोर्ट्सचा हा दावा आहे की कंगनाने कोर्टात सांगितलं आहे की जावेद अख्तर तिला म्हणाले आम्ही धोकेबाज लोकांना मार्गाला लावतो...जावेद अख्तर यांनी हेदेखील म्हटलं होतं की ऋतिक सोबत तुझं अफेअर नव्हतं तर तूच धोकेबाज होतीस.कंगनाने हा दावाही केला आहे की जावेद अख्तर तिला म्हणाले होते की तुझं तोंड काळं करू, लोकांसमोर तुझी इमेज बिघडवू.कंगना ही तिच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते आता तिने जावेद अख्तर यांच्याविरोधात हे दावे केले आहेत